Traffic Jam on Western Express Highway
saam tv

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Traffic Jam on Western Express Highway : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे ते अंधेरी या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. दीड तासापासून वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Published on

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेकडून अंधेरीचे दिशेने जाणारा मार्गावर मागील एक ते दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वांद्रे,खेरवाडी,वाकोला,विलेपार्ले,अंधेरी या सर्व परिसरात रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या क्षमता पेक्षा जास्त गाड्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर उतरल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

वांद्रे ते अंधेरी अर्धा तासाच्या प्रवास मात्र वाहन चालकांना दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे. खरंतर संध्याकाळची वेळ आहे, मोठा संख्येने चाकरमानी कामावरून घरी निघाले आहेत, मात्र या वाहतूक कोंडीमुळे दीड तासापासून एकाच जागी अडकून पडलेत. तर दुसरी बाजूने ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com