Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Mumbai Local train derailed : मध्य रेल्वेवरील टिटवाळा सीएसटी लोकलच्या गार्डचा डब्बा घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल
Mumbai Local train Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

मुंबई : कल्याणमधून मोठी बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा सीएसएमटी लोकलच्या गार्डचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. डबा घसरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डबा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली. कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लोकल ट्रेनचा गार्डचा डब्बा घसरल्याची घटना घडली आहे. मुंबईकडे याणारी टिटवाळा सीएसमटी लोकल ट्रेनच्या गार्डचा डबा रुळावरून घसरला. या लोकलमध्ये किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप हातील आलेली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ट्रेनच्या गार्डचा डबा रुळावरून घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी तातडीने गेले. त्यांनी तातडीने डबा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. ऐन घरी जाण्याच्या वेळी घटना घडल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल
Chankaya Niti On Parents : अशा स्वभावाच्या आई-वडीलांना मुलं मानतात शत्रू, तुम्ही देखील यात आहात का ?
मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल
Assam Train Accident : आठवडाभरातच दुसरा मोठा रेल्वे अपघात, आसाम-अगरताळा- एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

दरम्यान, टिटवाळा सीएसएमटी लोकलचा घसरलेला डबा तब्बल साडे चार तासांनी रुळावर काढयला. आज साडे बारा वाजण्याच्या सुमारास टिटवाळा सीएसएमटी लोकल मुंबईच्या दिशेने रवाना निघाली होती. टिटवाळाहून सीएसटीएमच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या गार्डचा डबा कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रुळारून घसरल्याची घडली होती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com