Chankaya Niti On Parents : अशा स्वभावाच्या आई-वडीलांना मुलं मानतात शत्रू, तुम्ही देखील यात आहात का ?

Chanakya Niti for child : पालक आपल्या मुलांच्या हट्टी स्वभावाला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतात.
Chankaya Niti On Parents
Chankaya Niti On ParentsSaam Tv

Parenting Tips : पालक नेहमीच मुलांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करत असतात. त्यांना लाडाने वाढवतात पण त्यांची एक चुक मुलांच्या मनात घर करुन राहाते. यामुळे ते पालकांपासून अधिक दुरावले जातात.

बरेचदा असे होते की, पालक (Parents) आपल्या मुलांच्या हट्टी स्वभावाला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतात पण जर तो कल मुलांच्या दृष्टीकोनातून नसेल तर मुलांची चिडचिड होते. आचार्य चाणक्य यांच्या मते, पालक अशा अनेक चुका करतात, ज्या मुलासाठी आणि पालकांसाठी अधिक त्रासदायक ठरते. त्या सुधारल्या तर मुलांचे भविष्य अधिक उज्जवल होऊ शकते. त्याचबरोबर आई-वडीलही आनंदी जीवन जगतात. याशिवाय संपत्तीतही वाढ होते. तुम्हालाही तुमच्या मुलाला यशस्वी (Success) व्यक्ती बनवायचे असेल तर या 3 चुका करू नका. जाणून घेऊया-

Chankaya Niti On Parents
Chanakya Niti On Relationship : या स्वभावाचे पुरुष असतात स्त्रियांसाठी अधिक भाग्यशाली, लग्नानंतर बदलते दोघांचेही नशीब...

1. जे पालक आपल्या पाल्याला संस्कार देत नाहीत. ते मुल कधीच सुसंस्कृत आणि सभ्य बनत नाही. ते स्वतःच्या मुलाचे शत्रू बनतात. यामुळे मुलाचे भवितव्य तर बिघडतेच, शिवाय पालकांचा जीवही धोक्यात येतो. मुले चुकीच्या मार्गावर चालायला लागतात. यामुळे पालकांची सामाजिक चेष्टा होते. यासोबतच मुलेही चुकीच्या कृत्यांसाठी शिक्षेचा भाग बनतात.

2. मुलांना शिक्षण (Education) देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यासाठी शिक्षण देण्यात पालकांनी कंजूसपणा करु नये. याकडे दुर्लक्ष केल्यास मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहू शकतात. जे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत नाहीत. ते स्वतःच्या मुलाचे शत्रू आहेत. उच्च शिक्षणाअभावी मुलाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

Chankaya Niti On Parents
Chanakya Niti On Money : अचानक धन मिळाल्यावर करु नका या चुका, व्हाल कंगाल ! चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

3. आचार्य चाणक्य म्हणतात की मुलाचे जास्त लाड करणे योग्य नाही. यामुळे मुले बिघडतात. यासोबतच मुलंही हट्टी होतात. यानंतर मुले त्यांना हवे ते करू लागतात. हा हट्टीपणा मुलासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी योग्य नाही. यामुळे मुले बिघडतात. यासाठी मुलाचे जास्त लाड करू नका.

Chankaya Niti On Parents
Kirthi Shetty : काली काली जुल्फों के फंदे ना डालो...

4. मुलाने आज्ञाधारक असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, वडिलांनी मुलांचे संगोपन करणे आवश्यक आहे. मुलाच्या संगोपनात वडिलांची कमतरता असेल तर मुलाचा सर्वांगीण विकास होत नाही. असे पालक आपल्या मुलांचे शत्रू बनतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com