
विनायक वंजारे, साम प्रतिनिधी
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांना केलाय. मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये तब्बल ८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आलंय. ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम केले असल्याची सांगितले गेले, त्याठिकाणी भिंतच नसल्याचे समोर आलेय. यावर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असं पत्रकार परिषदेत सांगितंल.
पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा नाहक बळी जातो. या घटनांना आळा घालण्यासाठी म्हाडाने ठिकठिकाणी दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात येत होत्या. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत डोंगर उतारांवरील भागांमध्ये संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमांतून हे काम केले जातंय.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी उपलब्ध करून दिला गेलाय. मात्र या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई उपगरनचा पालकमंत्री आशिष शेलार यांनी केलाय. ज्या ठिकाणी भिंत बांधण्यात येणार होती, त्या ठिकाण भिंत नसल्याचं दिसून आल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघतोय. भ्रष्टाचारी दुराचारी, दुराग्रही, उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा पराभव कधी होतो याची वाट बघतोय. आमचेही हात शिवशिवत आहेत, पण मामला कोर्टात आहे.
कोर्टामध्ये आरक्षणाच्या विषयांमध्ये एकदा तो तिढा म्हणजेच प्रश्न सुटला की, आम्ही दोन हात करायला तयार आहोत, आम्ही ऐकलं आजकाल दस्तक घेऊन फिरणार आहे. पूर्वी दत्तक होतं आता दस्तक झालं, याच्यापुढे आणखी काहीतरी हिरवा रंग दुसरा येईल हे उद्धव ठाकरे सेनेचे काम आहे, आम्ही वाट बघतोय मुंबईकर वाट बघतायेत या 25 वर्षांमध्ये जो बट्ट्याबोळ आणि भ्रष्टाचार झाला. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याला जबाबदार आहेत, मुंबई त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, आशिष शेलार म्हणालेत.
कुटुंब एकत्र आलं तर चांगलीच गोष्ट आहे, कुठलेही कुटुंब तूटाव फुटावं, असं काही आमचं मत नाही, बंद दाराआड ते एकत्र जेवले असतील चर्चा झाल्या असतील गप्पा झाल्या असतील, मला माहित नाही. पण झालं असेल तर चांगलं आहे. कुठलेही कुटुंब एकत्र राहिल पाहिजे. राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात पण कुटुंब एकत्र राहिल पाहिजे, असं शेलार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.