Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरे- शरद पवार भाजपसोबत जाणार'; माजी मंत्र्यांच्या दाव्यानं मोठी खळबळ, VIDEO

sharad pawar and uddhav thckeray : राज्यातलंच नव्हे तर केंद्रातलंही राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावा एका माजी मंत्र्यानं केलाय. हा दावा कुणी केलाय आणि कोणते दोन मोठे नेते केंद्रातल्या भाजसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Uddhav Thackeray , Sharad Pawar news
Sharad Pawar and Uddhav ThackeraySaam Tv
Published On

उदय सामंत शिंदेंना धक्का देणार, काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार, तर ठाकरेंचे आमदार खासदार शिंदे सेनेत जाणार अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखी एका मोठ्या दाव्यानं राज्य़ात खळबळ माजलीय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केलाय. ते नेमकं काय म्हटले आहेत पाहूयात.

Uddhav Thackeray , Sharad Pawar news
PM Modi Podcast : मी रंग बदलणारा माणूस नाही! - नरेंद्र मोदी

लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी टेकू दिलाय. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील संख्याबळावर

मोदी सरकारचं संख्याबळ

भाजप - 240

टीडीपी (चंद्राबाबू नायडू) - 16

जेडीयू (नितीश कुमार) - 12

एनडीएतील इतर घटक पक्ष - 24

एकूण - 292 खासदार आहेत. बहुमताचा आकडा 273 आहे.

टीडीपी आणि जेडीयूनं पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे 264 खासदार राहणार आणि सरकार अल्पमतात येणार

Uddhav Thackeray , Sharad Pawar news
Diljit-modi Viral Video : दिलजीत डोसांझनं गायलं गाण, मोदींनी दिली दाद ; व्हिडीओ झाला व्हायरल

त्यामुळेच प्लान बी म्हणून मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सोबत घेणार असल्याचा दावा कडूंनी केलाय. आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असणारं संख्याबळ नेमकं कितीये.

ठाकरे - पवार मोदी सरकारसोबत जाणार?

शिवसेना (UBT) - 9 खासदार

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 8 खासदार

एकूण - 17

जर मोदी सरकार अल्पमतात आलं तर त्यांना 9 खासदारंची गरज भासणार आणि पवार-ठाकरेंचे मिळून 17 खासदार असल्यामुळे हा आकडा थेट 281 वर जाणार.

Uddhav Thackeray , Sharad Pawar news
PM Modi podcast: पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं

नितीश कुमारांची पार्श्वभूमीवर लक्षात घेतली तर नितीशकुमार कधीही भाजपला झटका देऊ शकतात. तर चंद्राबाबू नायडूंचंही राजकारण धर्म निरपेक्षतेच्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे तेदेखील राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावरून जोरदार चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com