मुंबईच्या सात प्रमुख तलावांमध्ये ८८.७०% पाणीसाठा
एकूण साठा १२ लाख ८३ हजार ८२६ दशलक्ष लिटर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा किंचित कमी
विहार तलाव १००% भरला असून मोडक सागर ९९.९९% आणि तुळशी तलाव ९९.८७% भरले
मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये सध्या एकूण १२ लाख ८३ हजार ८२६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा साठा तलावांच्या एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या ८८.७० टक्के इतका आहे. भांडुप मास्टर कंट्रोल सेंटरच्या जल अभियंता विभागाच्या माहितीनुसार, रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताची ही स्थिती आहे.
यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सातही तलावांमध्ये १२ लाख ८९ हजार ७९६ दशलक्ष लिटर, म्हणजेच ८९.११ टक्के साठा होता. तर २०२४ मध्ये याच कालावधीत १३ लाख १५ हजार १६५ दशलक्ष लिटर, म्हणजे ९०.९७ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला होता.
तलावनिहाय पाहता विहार तलाव १०० टक्के, मोडक सागर ९९.९९ टक्के आणि तुळशी तलाव ९९.८७ टक्के भरला आहे. तानसा तलावात ९८.७७ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९०.५५ टक्के, भातसामध्ये ८६.८२ टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये ८०.१४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या सरी सुरू होत्या. अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथे प्रत्येकी २१ मिमी पावसाची नोंद झाली. भातसा येथे १३ मिमी, तुळशी व तानसा येथे ८ मिमी, तर विहार येथे ४ मिमी पाऊस झाला.
विहार तलाव ७ जुलैपासून ओसंडून वाहत आहे. मात्र, तानसा धरणातील पाण्याची पातळी किंचित कमी झाली असून, मोडक सागरमध्येही किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. मध्य वैतरणाचा WSCPO गेट बंद असून, अप्पर वैतरणातून पाण्याचा विसर्ग ६ जुलैपासून बंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.