Mumbai Rain News: मुंबईत पावसाची हजेरी! आजही ढगाळ वातावरण, उकाडा कायम; विदर्भ, मराठवाडा अन् कोकणात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today: मुंबईत काल अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज देखील विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईत पावसाची हजेरी
Mumbai Rain NewsSaam Tv

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दादर परिसरात पावसाने चांगलाच जोर धरल्याचं दिलत आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येतेय. अचानक आलेला हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे.

पश्चिम उपनगरात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. कांदिवली, अंधेरी आणि वांद्रे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता (Maharashtra Weather Forecast Today) आहेत. पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये वेगाने घट होत आहे.

राज्यामध्ये सापेक्ष आर्द्रता वाढली (Monsoon Update) आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच बळकट होत आहेत. त्यामुळे मॉन्सूनसाठी पोषक असं हवामान तयार होत आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा, ढगाळ हवामान आणि उकाडा कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली (Mumbai Rain News) आहे.

मुंबईत पावसाची हजेरी
IMD Rain Alert : निकालाच्या दिवशीच महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

विदर्भ सोडून बहुतांश भागात कमाल तापमान ४० अंशांपेक्षा कमी आहे. ४ जूनच्या सकाळपर्यंत अमरावतीत उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भामध्ये पावसामुळे तापमाना कमी होण्याची शक्यता (Rainfall Alert) आहे. पुण्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुंबई आणि उपनगरातील नागरिक उष्णतेमुळे हैराण झाल्याचं चित्र आहे.

मुंबईत पावसाची हजेरी
Pune Rain Video : पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com