Mumbai Rain: मुंबईतील पावसाचा नेतेमंडळीला फटका! मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास; VIDEO

Anil Patil and MLA Amol Mitkari Stuck In kurla Railway Station: मुंबईतील पावसाचा नेत्यांनाही फटका बसला आहे. मंत्री अनिल पाटील आणि अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
 मुंबईतील पावसाचा नेत्यांचीही फटका
Mumbai Rainsaam tv

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

मुंबईच्या पावसाने फक्त चाकरमान्यांचीच नाही तर नेते मंडळीचे देखील मोठे हाल होत असल्याचं समोर आलंय. मुंबईच्या पावसाचा फटका नेतेमंडळीना देखील बसला आहे. मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना कुर्ला पोलिसांच्या बिट चौकीत काढावे लागले आहे. तर काही अंतर रेल्वे रुळावरुन चालत पार करावं लागलं (Mumbai Rain) आहे.

मुंबई पावसाचा नेतेमंडळीला फटका

सिधेश्वरी एक्सप्रेसने मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी अधिवेशनासाठी मुंबईकडे येत होते. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे यावेळी लोकल विद्याविहारच्या पुढे (Minister Anil Patil and MLA Amol Mitkari) जाईना. त्यामुळे नेतेमंडळी रस्त्यातच अडकून पडली होती. त्यानंतर हे दोघेही रेल्वेतून उतरले अन् त्यांनी चालत कुर्ला रेल्वे स्थानक गाठलं. तिथे खूप वेळ बसल्यानंतर आता ते पोलीस वाहनातून मुंबईकडे रवाना झाले होते.

नक्की काय घडलं?

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनाच मुंबईतील मुसळधार पावसामुळे मदत भासल्याचं समोर आलंय. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेला खोळंबा झालेला आहे. यामध्ये मंत्री अनिल पाटील देखील अडकले होते. मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला (kurla Railway Station) होता. परंतु आता पावसामुळे सर्व जनजीवनच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे सरकारचा दावा फोल ठरल्याचं बोललं जात आहे.

 मुंबईतील पावसाचा नेत्यांचीही फटका
Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुंबई

पावसाळी अधिवेशनला जाण्यासाठी प्रचंड हाल झाले असल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनात आज यावर गदारोळ होण्याची शक्यता वर्तविली जात (Mumbai Rain Update) आहे. पावसामुळे मुंबईत रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालीय. चाकरमान्यांचे मोठे हाल देखील होत आहे. शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नेतेमंडळीला देखील या पावसाचा फटका बसला आहे.

 मुंबईतील पावसाचा नेत्यांचीही फटका
Mumbai Rain: मुंबईत रात्रभर पावसाचा हाहाकार; रेल्वे ठप्प, प्रवाशांचे झाले हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com