मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खासदार सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत

Mumbai-Pune Expressway: महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली. खासदार सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या. पुणे-सातारा आणि मुंबई-गोवा महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Mumbai Pune expressway traffic jam
Mumbai Pune expressway traffic jam Saam TV
Published On

Mumbai Pune expressway traffic jam Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला. आज 'महाराष्ट्र दिन' आणि त्यानंतर शनिवार-रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांच्या गर्दीने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ३ ते ४ तासांपासून सुप्रिया सुळे वाहतूककोंडीत अडकल्या आहेत. याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यालयासमोर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण होणार होते. मात्र, या वाहतूक कोंडीमुळे त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. अखेर स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे झेंडावंदन पार पडले. मुंबईहून पुण्याकडे निघाल्यानंतर आपण वाहतूक कोंडीत अडकलो असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दिली. आज पुणे शहर आणि ग्रामीण भागात सुप्रिया सुळे यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र अडीच तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत गेल्यामुळे त्यांनी संबंधित आयोजकांना नियोजित कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पुणे-सातारा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे आणि मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. महाराष्ट्र दिन आणि त्याला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याहून सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची महामार्गावर मोठी गर्दी दिसून येत आहे.

खेड शिवापूर टोलनाक्यापासून ते नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवासी तासनतास या कोंडीत अडकले आहेत. टोल नाक्यावरून पुढे जाण्यास विलंब होत असल्याने वाहनांची संख्या मागे वाढत चालली आहे. पुणे-सातारा महामार्गावर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Pune expressway traffic jam
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ३८०० रूपयांनी झालं स्वस्त, वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथे आज भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी कोकणात निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही अर्धवट असून, मुख्य रस्त्याऐवजी प्रवाशांना खराब सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे या कोंडीत अधिकच भर पडत असून पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Pune expressway traffic jam
दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात काल रात्रीपासूनच मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. संगमेश्वर स्थानकापासून मुंबईच्या दिशेला सुमारे २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने आणि सध्या केवळ एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे ही कोंडी होत असल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbai Pune expressway traffic jam
HSC Result 2026 : बारावीच्या निकालाची तारीख अन् वेळ ठरली, mahahsscboard.in वर पाहा रिझल्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com