पहिल्याच पावसात गुणवत्ता 'मिसिंग'; मे महिन्यात उद्घाटन 6 जुलैला कोसळली दरड

Mumbai Pune Missing Link Landslide : 1 मे रोजी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यात दरड कोसळली आहे. त्यामुळे सात हजार कोटींच्या या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मिसिंग लिंकवर नेमकं काय झालंय? आणि यावरून कसं राजकारण तापलंय ? पाहूया एक रिपोर्ट.
Mumbai Pune Missing Link  Landslide :
Mumbai Pune Missing Link Landslide :
Published On

मे महिन्याच्या एक तारखेला ज्या 'मिसिंग लिंक'चा मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं ती लिंक अवघ्या दोनच महिन्यात मिसिंग झाली. सोमवारी पहाटे बोगद्याजवळ दरड कोसळली आणि संरक्षक भिंतीचा भाग थेट पुलावर आला. सुदैवाने पहाटेची वेळ म्हणून जीवितहानी टळली.

देशातील सर्वात उंच 'केबल स्टेड पूल'... कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला होता. पण पहिल्याच पावसाने या दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे. आधी पुलावर खड्डे पडले आणि आता थेट दरड कोसळली. मुख्यमंत्र्यांनी मात्र यासाठी मुसळधार पावसाला जबाबदार धरलय.

Mumbai Pune Missing Link  Landslide :
ठाणे, कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर KDMCचा निर्णय

तथाकथित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जो बोगदा बनवला होता.. त्या बोगद्याच्या संरक्षक भींतीचा स्लॅबच कोसळला. त्यामुळे डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. दरम्यान, मिसिंग लिंकच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेसेनेने केलाय. पहिल्याच पावसात ‘Infra Man’ चा ‘Disaster Man’ झाला....दोन खड्ड्यांना ‘पहिल्या पावसाचं टेस्टिंग’ म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही ‘मान्सून ट्रायल’ म्हणणार का?

जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प… पण पहिल्याच पावसात विकासच ‘मिसिंग’ झाला आहे”.

यावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत

1- पूर्ण खबरदारी न घेताच घाईघाईने या प्रकल्पाचे लोकार्पण उरकले का?

2- पावसाळ्यापूर्वी डोंगराची सुरक्षितता का तपासली गेली नाही?

3- पावसाची तीव्रता लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली नाही का?

४.बोगदा क्रमांक दोनमध्ये तीन जुलैला चालत्या गाडीवर दगड पडला होता. दोन खड्डेही पडले होते. त्यानंतरही काहीच उपाययोजना का केली नाही?

कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच कामं केली जातात का? असा संतप्त सूर सर्वत्र उमटतोय. ही अक्षम्य चूक आहे आणि याला जबाबदार कोण? जनतेच्या घामाचा ७ हजार १२० कोटी रुपयांचा निधी पाण्यात गेला का? इतका अवाढव्य खर्च करूनही जर पहिला मुसळधार पाऊस मिसिंग लिंक पेलू शकत नसेल, तर मग हे तथाकथित 'अत्याधुनिक' तंत्रज्ञान आणि गाजावाजा केलेला गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड काय कामाचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com