Mumbai Pune Highway News : मुबई-पुणे महामार्गावर वाहतूक मंदावली, अवजड वाहनांवर वाहतूक विभागाची बंदी

Pune News: मुबई-पुणे महामार्गावर वाहतूक मंदावली
Mumbai Pune Highway News
Mumbai Pune Highway NewsSaam TV
Published On: 

Mumbai Pune Highway News : आज सार्वजनिक सुट्टीचे निमित्त साधून अनेकजण मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करत आहेत. यामुळे वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे मुंबई-पुणे महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास वाहतूक मंदावली होती. मात्र आता वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवार आणि रविवार मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. यातच शुक्रवार, शनिवार व रविवार अशी सलग 3 दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने, नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने आपआपली वाहने घेवून मार्गावरुन प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत वेळेस मार्गावरून अवजड वाहतुक सुरु राहील्यास मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. (Latest News Update)

Mumbai Pune Highway News
Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi: 'माफी मागा, मग महाराष्ट्रात पाय ठेवा', चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

यामुळे वाहतूक विभागाने 15 आणि 16 एप्रिल रोजी या मार्गावर अवजड वाहनांना प्रवासासाठी बंद घातली आहे. यासोबतच ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा खारघर नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

Mumbai Pune Highway News
BMC News: 'बीएमसी'तील भांडीचोर कोण? वर्षभरात 7 हजार चमचे चोरीला, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

या कार्यक्रमाला रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्ह्यातून तसेच बाहेरील राज्यातून सुमारे १५ ते २० लाख लोक येण्याची शक्यता आहे. यामधील अनेक लोक हे खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवी मुंबई येथे येणार आहेत. म्हणूनही हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

हे मार्गही राहणार बंद

पंधरा तारीख दुपारी दोन वाजल्यापासून ते परवा म्हणजे सोळा तारखेला रात्री अकरा वाजेपर्यंत सोळा टन पेक्षा जास्त वजन असणाऱ्या अवजड वाहनांना ही प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. यात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, आणि नवी मुंबईकडे जाणारे सर्व भागातील रस्त्यांवर हा नियम लागू राहणार आहे.

या वाहनांवर हे निर्बंध लागू होणार नाही

वाहतूक पोलिसांनी घातलेले हे निर्बंध दुध, पेट्रॉल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इ. जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.