मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या ST बसला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी (२९ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. शिवराज माळी असं मृत कंडक्टरचं नाव आहे. (Latest Marathi News)
सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ठाणे डेपोची होती. ती उगमरग्याहून ठाण्याला येत होती.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका थांब्याजवळ प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली असता, पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक (Bus Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बस कंडक्टर शिवराज माळी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होती.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर धावत्या महिंद्रा पिकअप टेंपोला अचानक भीषण आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. या आगीत पिकअपमधील सामान जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीत गाडीमधील सामान जळून खाक झाले. बोनेटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.