Water Level In Mumbai Lakes: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पाणीकपातीचं संकट टळलं

Mumbai Lakes Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
water level in mumbai lakes 2023 today
water level in mumbai lakes 2023 todaySaam TV
Published On

Water Level in Mumbai Lakes 2023 Today

गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढली. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पाणीकपातीचं संकट देखील टळलं आहे. (Latest Marathi News)

water level in mumbai lakes 2023 today
Dhule Ganpati Visarjan: धुळ्यात गणेश विसर्जनाला गालबोट, बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ४ जणांना उडवलं

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत (Mumbai News) दाखल झालेला पाऊस महिन्याच्या शेवटपर्यंत बरसला. अजूनही मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांवर असलेली पाणीकपातीची समस्या आता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये शुक्रवारी पहाटेपर्यंत एकूण ९९.३३ इतका पाणीसाठा जमा झाला होता.

दरम्यान, धरणामध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा (Water Lavel) वर्षभर पुरेल एवढा असल्यामुळे आता पाणीकपात करण्याची आवश्यकता नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरदिवशी मुंबई शहर तसेच उपनगरांना ३९०० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते.

यासाठी ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. यंदा जुलै महिन्यात मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झाला होता. पहिल्याच पावसात तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा देखील जमा झाला होता.

पण, त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. पावसाचा लपंडाव पाहता मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने पाणीकपातीची शक्यता वर्तवली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने पाणीकपातीचं संकट टळलं आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, तानसा जलाशयात पाण्याची पातळी ९९.२६ टक्के इतकी असून मोडक-सागर जलाशयात ९९.९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा ९७.५२ टक्के, अप्पर वैतरणा ९९.३६ टक्के, भातसा ९९.०४ टक्के, विहार १०० टक्के आणि तुळशी १०० टक्के पाणी पातळी उपलब्ध आहे.

Edited by - Satish Daud

water level in mumbai lakes 2023 today
Ganpati Visarjan: मुंबईकरांची कृत्रिम तलावांनाच पसंती, ७२ हजार २४० घरगुती मूर्तींचे विसर्जन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com