Dhule Ganpati Visarjan: धुळ्यात गणेश विसर्जनाला गालबोट, बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ४ जणांना उडवलं

Dhule Breaking News: धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली.
Dhule breaking News for devotees crushed by tempo going for ganesh visarjan
Dhule breaking News for devotees crushed by tempo going for ganesh visarjanSaam TV
Published On

Dhule Ganpati Visarjan News

संपूर्ण राज्यभरात गुरुवारी गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे विसर्जन केले. दरम्यान काही ठिकाणी गणेश विसर्जनाला गालबोट देखील लागले. धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

Dhule breaking News for devotees crushed by tempo going for ganesh visarjan
Guhagar Accident: टेम्पोचा ब्रेक फेल झाला अन् विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू, गुहागरमधील घटना

या धडकेत एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. तीन वर्षीय चिमुकलीच्या पायावरून टेंपो गेल्यानी तिला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरुन टेम्पो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धुळे शहरातील (Dhule News) जुना आग्रा रोड मार्गाने दरवर्षी गणपती मंडळांकडून बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. पारंपारिक वाद्य तसेच डीजे आणि इतर वाद्यांच्या निघणारी मिरवणूक बघण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात. आज हे चारही भाविक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जात होते.

यावेळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी (Ganeshotsav 2023) घेऊन जात असलेल्या एका टेम्पोचे अचानक ब्रेक फेल झाले. काही कळण्याच्या आतच टेम्पोने रस्त्यावरून जाणाऱ्या या चारही भाविकांना धडक दिली. या घटनेमध्ये ३ वर्षीय सायली जोहरी तसेच तिची आई जस्सी जोहरी आणि पिंकी जोहरी हे तिघेही जखमी झाले आहे.

दरम्यान, अपघातानंतर या तिघांनाही तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायली जोहरी या तीन वर्षीय चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तिची आई गंभीर जखमी झाली आहे. तसेच एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरून टेंपो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. सदर घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने घटना स्थळाहून पळ काढण्याची माहिती समोर येत आहे.

Edited by - Satish Daud

Dhule breaking News for devotees crushed by tempo going for ganesh visarjan
Raigad Breaking News: रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न; उल्हास नदीत ४ जण वाहून गेले, एकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com