Raigad Breaking News
Raigad Breaking Newssaam tv

Raigad Breaking News: रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न; उल्हास नदीत ४ जण वाहून गेले, एकाचा मृत्यू

Raigad Breaking News: रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त वाहून गेल्याची घटना घडली आहे.
Published on

सचिन कदम

Raigad News:

रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रायगडच्या कर्जत येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर एक जण सुखरुप बचावला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनासाठी गेले होते. या गणेशभक्तांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. कर्जतमधील उकृल येथील ही घटना आहे. आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

Raigad Breaking News
Mumbai Breaking News: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू चौपाटीवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू

या उल्हास नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर एकजण सुखरूप बचावला आहे. तसेच या घटनेत दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दोन्ही बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com