

मुंबईतील आंदोलनामुळे मॉडेल रिया अहिर चर्चेत
रिया अहिरने पोलिसांचे वाहन अडवले होते
तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
या व्हिडीओनंतर तिला ट्रोल केले जात आहे
मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांचे वाहन अडवल्यामुळे चर्चेत आलेली २७ वर्षीय मॉडेल रिया यादव अहिर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर रियाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. तिला ट्रोलिंग केले जात आहे त्याचसोबत तिला धमक्या देखील दिल्या जात आहे. आता या प्रकरणी रियाने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. रियाने आरोप केला आहे की, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तिला सतत ट्रोलिंग, छळ, बदनामी केली जात आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईसह नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथील अनेक जण सहभागी झाले होते. महत्वाचे म्हणजे या आंदोलनात सेलिब्रटी आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या रिया अहिरने पोलिसांचे वाहन अडवत घोषणाबाजी केली होती. या व्हिडीओनंतर तिला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सतत धमक्या देत ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आता रियाने शनिवारी सायबर सेलमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारीदुपारी सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटले. सोशल मीडियावर तिला जे लक्ष्य करत आहे त्यांच्यविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रियाने पोलिसांकडे केली. तक्रारीबद्दल रियाने सांगितले की, 'आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिला सतत अपमानास्पद कमेंट्स आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. माझा सतत छळ होत आहे. ऑनलाइन धमक्या, शिवीगाळ आणि माझ्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.सध्या हे सर्व सोशल मीडियावर घडत आहे. पण त्याचे रूपांतर अधिक गंभीर गोष्टीत होऊ शकते. यामुळे माझ्या आई-वडिलांना त्रास व्हावा असे मला वाटत नाही.'
पोलिसांनी सांगितले की,सायबर सेलला रिया अहिरची तक्रार मिळाली असून आरोपांची चौकशी सुरू आहे. तक्रारीची पडताळणी झाल्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनसमोर उभी राहिल्यामुळे सोशल मीडिया इन्फ्युअन्सर रिया अहिर चर्चेत आली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंडट व्हायरल झाला आणि रिया या आंदोलनाचा एक लोकप्रिय चेहरा बनली. अनेकांनी तिच्या धाडसाची प्रशंसा केली तर काहींना तिला ट्रोल केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.