Amrut Bharat Express : प्रवाशांसाठी गुड न्यूज! 'अमृत भारत एक्स्प्रेस’ आता दररोज धावणार, कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या

Amrut Bharat Express News : मुंबई–प्रयागराज विशेष रेल्वे आता नियमित अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार. 20435/20436 नवीन क्रमांक, वेळापत्रक, प्रमुख थांबे आणि डब्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Amrit Bharat Express 20435/20436 News
Amrit Bharat Express 20435/20436 NewsAI Image
Published On
Summary
  • अमृत भारत एक्सप्रेस आता दररोज धावणार

  • LTT–प्रयागराज विशेष रेल्वेला अमृत भारत एक्स्प्रेस नाव

  • गाडीमध्ये एकूण 22 डबे असून 11 सामान्य आणि 8 शयनयान श्रेणीचे डबे आहेत

मुंबईकरांसह उत्तर प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे सेवा आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत विशेष गाडी क्रमांक 04151/04152 म्हणून धावणारी ही सेवा आता ‘अमृत भारत एक्सप्रेस’ म्हणून नियमितपणे चालवली जाणार आहे. या गाडीला 20435/20436 असे नवीन क्रमांक देण्यात आले असून, ही साप्ताहिक सेवा असेल.

गाडी क्रमांक 20435 लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस 22 ऑगस्ट 2026 पासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 20436 प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस 21 ऑगस्ट 2026 पासून दर शुक्रवारी प्रयागराज येथून सायंकाळी 6.10 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 3.45 वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

Amrit Bharat Express 20435/20436 News
Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

या अमृत भारत एक्सप्रेसला कल्याण, भुसावळ, इटारसी, जबलपूर आणि सतना या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना या सेवेमुळे मोठी सोय होणार आहे. गाडीची रचना 22 डब्यांची असून, त्यामध्ये 11 सामान्य डबे, 8 शयनयान श्रेणीचे डबे, 1 पॅन्ट्री कार आणि 2 लगेज-कम-दिव्यांगजन ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

Amrit Bharat Express 20435/20436 News
Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर प्रवासासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा NTES ॲपला भेट द्यावी. तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन’ ॲपचा वापर करता येणार आहे. प्रवाशांनी विशेष गाडीच्या क्रमांकांमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन नवीन गाडी क्रमांक 20435/20436 नुसार आरक्षण आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com