मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा ड्युटीवरुन घरी जात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मांजाने गळा चिरुन पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे. समीर जाधव असं मृत पोलीस अंमलदाराचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नियमितपणे ते रविवारी देखील आपलं कर्तव्य बजावून घरी निघाले होते. बाईकवरुन जात असताना मांजाने गळा चिरुन ते गंभीर जखमी झाले होते. वाकोला ब्रिज येथे हा प्रकार घडला होता. (Latest Marathi News)
समीर यांना जखमी अवस्थेत सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समीर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मांजाला धार आणण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा सर्रास वापर केला जातो. जे अनेकदा लोकांच्या जीवावर बेततं. मांजा बनवण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.