Pune Covid News: पुणेकरांनो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, शहरात आढळले कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटचे 2 रुग्ण

Covid 19 In Pune: देशात आणि राज्यात कोरोनाच्या नवीन उपप्रकार जेएन-1 रुग्ण आढळत आहेत. यातच आज पुण्यातही या कोरोनाच्या या प्रकारचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
Covid 19 In Pune
Covid 19 In PuneSAAM TV
Published On

Pune Covid News:

देशात आणि राज्यात कोरोनाच्या नवीन उपप्रकार जेएन-1 रुग्ण आढळत आहेत. यातच आज पुण्यातही या कोरोनाच्या या प्रकारचे नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढल्याची माहिती माहीत आहे.

अशातच आता राज्यात रविवारी नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत 5, पुणे महापालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे. शासनाने आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Covid 19 In Pune
Mumbai-Pune Expressway Traffic: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची सुटी गेली प्रवासात वाया

देशभरात कोविड-19 चे 334 नवीन रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 24 तासांत 128 नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार, देशात 334 सक्रिय प्रकरणे आहेत, त्यापैकी 128 प्रकरणे केरळमधील आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार झाली आहे.  (Latest Marathi News)

केरळमध्ये एकाचा मृत्यू

केरळमध्ये गेल्या 24 तासांत एकाचा मृत्यू झाल्याने तीन वर्षांतील मृतांची संख्या आता 72,063 झाली आहे. तसेच 296 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची रुग्णांची संख्या 68,38,282 झाली आहे.

Covid 19 In Pune
Amit Shah On PM Modi: देशातील 140 कोटी लोकांना स्वावलंबी बनवणं पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मंगळवारी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, राज्यातील कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमध्ये लोकांनी काळजी करण्याची गरज नाही. या संसर्गाशी लढण्यासाठी रुग्णालय पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com