Mumbai-Pune Expressway Traffic: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची सुटी गेली प्रवासात वाया

mumbai-pune expressway traffic update today: मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज रविवारी एक्स्प्रेस वेवर सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
mumbai-pune expressway traffic update
mumbai-pune expressway traffic update Saam tv
Published On

Traffic Jam on Mumbai-Pune Expressway:

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज रविवारीदेखील एक्स्प्रेस वेवर सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. नाताळच्या सुटीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावर देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, पर्यटक चांगलेच त्रस्त झाले आहेत. (Latest Marathi News)

ख्रिसमस, नववर्षानिमित्त अनेक पर्यटक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे महमार्गावर पर्यटक गेल्या २४ तासांपेक्षा अधिक काळ ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mumbai-pune expressway traffic update
Maharashtra Political News : महाविकास आघाडीचं ठरलं! लोकसभेच्या कोण किती जागा लढणार? आकडे आले समोर

ख्रिसमस आणि विकेंड सुट्टी लागून आल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर, खोपोलीपासून पुढे घाट रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

mumbai-pune expressway traffic update
Pune Metro Extension : पुण्यातील स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकरच होणार सुरू? अजित पवार म्हणाले...

टोल कर्मचाऱ्यांची दमछाक

मुंबई एक्स्प्रेस हायवेवर कालपासून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महामार्गावर विकेंड सुटी, नाताळच्या सुटीमुळे पर्यटकांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे टोल नाक्यावर लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी टोल कर्मचारी यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंध

नाताळ आणि विकेंडच्या सुट्ट्यामुळे घराबाहेर पडलेले पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकले आहेत. सलग सुट्ट्यामुळे अवजड आणि जड वाहनांना रविवार आणि सोमवार या दिवशी दुपारी १२ वाजल्यानंतर घाटातून प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com