Mumbai Accident: गणेशगल्लीमध्ये बेस्टने महिलेला चिरडले, चालकावर नागरिक संतापले

BEST Bus Accident In Lalbaug: लालबागच्या गणेशगल्लीमध्ये अपघात झाला. बेस्टच्या बसने महिलेला चिरडले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली.
Mumbai Accident: गणेशगल्लीमध्ये बेस्टने महिलेला चिरडले, चालकावर नागरिक संतापले
BEST Bus Accident In LalbaugSaam Tv
Published On

गणेश कवडे, मुंबई

मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. बेस्टच्या बसने एका महिलेला चिरडले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली. बसचे चाक महिलेच्या पायावरून गेले. गणेशभक्त गणेशगल्लीमध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना ही घटना घडली. या अपघातानंतर नागरिकांनी बस रोखून धरली आणि चालकावर संतापले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशगल्लीमध्ये गणेश भक्त आनंदोत्सव साजरा करत होते. त्यावेळी त्याठिकाणावरून जाणाऱ्या बेस्टच्या बसने महिलेला चिरडले. बाप्पाच्या दर्शनसाठी आलेल्या महिलाला बेस्टच्या बसने आधी धडक दिली. त्यानंतर बस या महिलेच्या पायावरून गेली. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली. पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी बसला घेराव घातला आणि चालकावर संतापले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या गणेशगल्लीत बाप्पाच्या दर्शनासाठी २४ तास गर्दी बघायला मिळत आहे.

Mumbai Accident: गणेशगल्लीमध्ये बेस्टने महिलेला चिरडले, चालकावर नागरिक संतापले
Kolhapur Accident: हृदयद्रावक! बोलेरो- ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील ३ तरुण ठार; ४ जण जखमी

दरम्यान, लालबागमध्ये आठवडाभरापूर्वी बेस्टच्या बसने ९ जणांना चिरडले होते. १ सप्टेंबरला रात्री हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तर ८ जण गंभीर जखमी झाले होते. एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने चालकाला ढकलून बसचे स्टेअरिंग हातामध्ये घेऊन ते वाकडे तिकडे हलवले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने अनेक वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला अटक केली.

Mumbai Accident: गणेशगल्लीमध्ये बेस्टने महिलेला चिरडले, चालकावर नागरिक संतापले
Mumbai Best Bus Accident : मुंबईत पुन्हा बेस्ट बसचा भीषण अपघात, ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com