Vasai Monsoon Places : एक उनाड दिवस! 'वसई'तील बेस्ट मान्सून स्पॉट, आठवडाभराचा ताण सेकंदात जाईल पळून

Best Vasai Beaches : पावसाळ्यात एक दिवसाची पिकनिक प्लान करत असाल तर, वसईतील ‘या’ ठिकाणांना आवर्जून भेट द्या. पाहता क्षणी प्रेमात पडाल असे निसर्ग सौंदर्य अनुभवा.
Best Vasai Beaches
Vasai Monsoon PlacesSAAM TV
Published On

रोजच्या कामातून कंटाळा आला असेल आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर, वसईतील (Vasai) समुद्रकिनाऱ्यांना भेट द्या. पावसाळ्यात या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य आणखी खुलून येते. आठवडाभराचा ताण तुमचा निघून जाईल. तर मग या वीकेंडला (Weekend) आपल्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत किंवा जोडीदारासोबत वसईचा प्लान करा.

भुईगाव

भुईगाव वसईतील शांत समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनारी दाट सुरूची वने पाहायला मिळतात. प्री वेडिंग शूटसाठी हा बीच उत्तम ठिकाण आहे. येथील झाडांची हिरवळ मन मोहून टाकते. नालासोपारा स्टेशनला उतरून तुम्ही भुईगावसाठी बस पकडा.

राजोडी बीच

वसईतील राजोडी बीच (Rajodi Beach)पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. एक सुंदर दिवस तुम्ही येथे तुमच्या कुटुंबासोबत घालवू शकता. तसेच येथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय केली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावरून तुम्ही बसने येथे पोहचू शकता.

रानगाव

रानगाव हा वसईतील सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी येथील वातावरण खुलून येते. समुद्रकिनारी वाळूमध्ये किल्ला बनवायची मजा काही वेगळी असते. येथे एकदा गेलात तर तुम्हाला पुन्हा यावस वाटलं. रानगाव समुद्रकिनाऱ्याला जाण्यासाठी वसई रेल्वे स्टेशनवरून रिक्षा पकडावी.

सुरूची समुद्रकिनारा

सुरूची समुद्रकिनारा हा वसईच्या दक्षिणेला आहे. नावाप्रमाणेच येथे खूप सुरूची झाडे आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक निवांत संध्याकाळ येथे घालवू शकता. सुरूची बीचला पोहोचण्यासाठी वसई रेल्वे स्टेशनला उतरून भास्कर आळीसाठी बस पकडावी.

Best Vasai Beaches
Monsoon Special : रिमझिम पावसाच्या सरी अन् थंडगार वारा, 'सांगली' तील निसर्गसौंदर्य खुणावते पर्यटकांना

अर्नाळा बीच

वसई तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे अर्नाळा बीच (Arnala Beach) होय. पावसाळ्यात पर्यटकांची पावले आपोआप या बीचकडे वळतात. अर्नाळा बीचपासून जवळ अर्नाळा किल्ला देखील आहे. विरार रेल्वे स्टेशनपासून तुम्ही रिक्षा किंवा बसने येथे जाऊ शकता. आपल्या जोडीदारासोबत एक संध्याकाळ येथे नक्की घालवा.

नवापूर

वसईच नवापूर गाव हे पर्यटकांचे आकर्षण आहे. अर्नाळापासून अगदी हाकेच्या अंतरावर नवापूर बीच आहे. हा एक शांत समुद्रकिनारा आहे. विशेषता या ठिकाणी फुलांची शेती केली जाते. सायंकाळच्या वेळी बीचवर अत्यंत रमणीय वातावरण असते. सूर्यास्ताचे सुरेख दृश्य पाहायला मिळते. विरार रेल्वे स्टेशनला उतरून नवापूरला जाणारी बस पकडा. नवापूरला पोहचल्यावर तुम्ही ५ मिनिटांत नवापूर बीचला जाल.

कळंब बीच

वसई तालुक्यातील कळंब बीच (Kalamb Beach)सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. येथून तुम्हाला निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळेल. वसई-विरारच्या लोकांसाठी हा सुंदर समुद्रकिनारा पर्यटनासाठी खास आहे. येथे तुम्हाला बोटिंग आणि घोडेस्वारीचा आनंद घेता येतो. हा समुद्रकिनारा लांब पसरलेला आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही बस किंवा रिक्षाने जाऊ शकता.

Best Vasai Beaches
Monsoon Travel : निसर्गप्रेमींसाठी नंदनवन! पावसाळ्यात करा 'गडचिरोली' ची सफर, टेन्शन विसराल अन् मूड होईल फ्रेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com