Mumbai Fire: अंधेरीत अग्नितांडव, रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

Andheri Hospital Fire News: मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मरोशी रोडवर सुरभी हॉस्पिटलचा इमारतीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली. रविवारी संध्याकाळी दहाच्या सुमारास सुरभी हॉस्पिटल इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ही मोठी आग लागली.
Mumbai Fire: अंधेरीत अग्नितांडव, रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Andheri Hospital Fire News: Saamtv
Published On

संजय गडदे, मुंबई|ता. २३ सप्टेंबर

Mumbai Fire News: मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मरोशी रोडवर सुरभी हॉस्पिटलचा इमारतीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली. रविवारी संध्याकाळी दहाच्या सुमारास सुरभी हॉस्पिटल इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ही मोठी आग लागली. आगीचा माहिती मिळतच अग्निशमन दलाचा 6 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल 1 तासामध्ये अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Mumbai Fire: अंधेरीत अग्नितांडव, रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Maharashtra Politics : मी बोलायचं म्हटलं तर पळता भुई थोडी होईल; गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपली

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मरोशी रोडवर सुरभी हॉस्पिटलचा इमारतीमध्ये मोठी आग लागली. रविवारी संध्याकाळी दहाच्या सुमारास सुरभी हॉस्पिटल इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा 6 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल 1 तासामध्ये अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

मीटर बॉक्समधली आग मोठी झाल्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सुरभी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि आग पसरली. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये असलेले चार रुग्ण आणि हॉस्पिटलच्या स्टाफला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याच्या प्राथमिक माहिती मिळत आहे.

Mumbai Fire: अंधेरीत अग्नितांडव, रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Saptashrungi Ghat Closed: भाविकांसाठी महत्वाची बातमी! सप्तशृंगी गडावर जाणारा घाट ३ दिवस बंद, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय; वाचा सविस्तर

दरम्यान, या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलच्या नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरू आहे. या आगी संदर्भात अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Fire: अंधेरीत अग्नितांडव, रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com