Mumbai Traffic News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज अनेक मार्ग बंद, पर्यायी वाहतूक कशी ?

Mumbai Traffic News : मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
Mumbai Traffic
Mumbai TrafficMumbai Traffic
Published On

Mumbai Traffic News : मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. आज सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे आज वांद्रे-कुर्ला संकुलासाठी (BKC) वाहतूक नियम जाहीर करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे.

आज होणाऱ्या कार्यक्रमावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रमुख रस्ते बंद करत पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली आहे. विलंब टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून कऱण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांकडून (वाहतूक) वाहतुकीबाबात अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे.

कोणता मार्ग बंद, पर्यायी वाहतूक कशी ?

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, रामकृष्ण परमहंस मार्ग (Ramkrishna Paramhansa Marg) आणि जेएल शिर्सेकर मार्ग (J. L. Shirsekar Marg) यांना जोडणारा न्यू इंग्लिश स्कूल रोड बंद केला जाणार आहे. मात्र कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सदर रस्ता वापरण्याची परवानगी आहे. याला पर्याय म्हणून वाहनचालकांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोडचा वापर (Mahatma Gandhi Vidya Mandir road) करता येणार आहेत. दरम्यान रात्री 9 नंतर या मार्गावरील नियमित वाहतूक सुरू होणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते अनावरण

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायामुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत.

सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे १६ ऑगस्ट १८६२ रोजी स्थापन झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. नोव्हेंबर १८७८ मध्ये बांधण्यात आलेली ही भव्य इमारत केवळ ६ न्यायालये आणि दहा न्यायाधीशांच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून औद्योगिक आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे. काळानुरूप मुंबई उच्च न्यायालयाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशा इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com