Kanpur Dehat Factory Fire: उत्तर प्रदेशातील कानपूर रानिया येथे फोम कार्डबोर्ड बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा मजुरांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. ही आग इतकी भयंकर होती की कारखाना जळून खाक झाला, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशच्या खानापूर खडंजा भागात एका पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. आरपी पॉलीपॅक असे नाव असलेल्या या कारखान्यात ठेवलेल्या सिलिंडरचा शनिवारी सकाळी स्फोट झाला, त्यानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांना अचानक बॉम्बसदृश स्फोटांचा आवाज आला. ते धावत कारखान्याकडे आले. कारखान्याला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे त्यांनी पाहिले. ही माहिती तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमींना उपचारासाठी कानपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डीएम आलोक सिंह, एसपी बीबीजीटीएस मूर्ती, एएसपी राजेश पांडे, सीओ तनु उपाध्याय यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
या कारखान्यात कारखान्यात अनेक फोम पुठ्ठ्याचे बॉक्स ठेवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. सिलिंडरच्या स्फोटानंतर या पुठ्ठ्यांच्या पेट्यांना आग लागली. स्फोटामुळे कारखान्याची भिंत कोसळून काही कामगार अडकले. आरपी पॉलीपॅक असे कारखान्याचे नाव आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाच तासांहून अधिक वेळ लागला, दरम्यान, हा कारखाना फायर एनओसीशिवाय सुरू होता. कारखान्याच्या मालकाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.