Mumbai Local Derail : परवा जिथं दुर्घटना घडली, तिथंच आज पुन्हा लोकल घसरली; हार्बर ठप्प, मध्य रेल्वेनं कारण सांगितलं

CSMT To Wadala Harbour Line Local Train: सलग दुसऱ्या दिवशी लोकल रुळावरून घसरण्याची घटना घडली आहे. वडाळा-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी कामवरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे.
Mumbai Local Derail
Mumbai Local NewsSaam TV
Published On

रुपाली बडवे, मुंबई

सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे. वडाळा-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकाजवळ परवा ज्या ठिकाणी लोकल रुळावरुन घसरली होती त्याच ठिकाणी आज पुन्हा लोकल रुळावरून घसरली आहे. मध्य रेल्वेकडून आज ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका पॉईंटवर दुरुस्ती करून पुन्हा एकदा रिकामी लोकल चालवण्यात येत होती. पण लोकल त्याच ठिकाणी येताच रुळावरून घसरली. लोकलचा एक डबा रुळावरून घसरला आहे.

Mumbai Local Derail
Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसने पती-पत्नीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO समोर

लोकल रुळावरून घसरल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. जोपर्यंत ही घसरलेली रिकामी लोकल पुन्हा रुळावर आणली जात नाही तोपर्यंत हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Mumbai Local Derail
Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

ऐन गर्दीच्या वेळी लोकल रुळावरून घसरल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुळावरून घसलेला लोकलचा डबा हटवण्याचे काम सुरू असून लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Mumbai Local Derail
Gauri Sawant First Reaction After Watching Taali: ‘आपलीच जीभ दाताखाली येते तेव्हा...’; ‘ताली’ पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com