Mumbra Local: मुंब्रा लोकल अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू? किती जखमी? अधिकृत माहिती समोर

Mumbai Local Train Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक गंभीर अपघात घडला. लोकल ट्रेनमधून अंदाजे १३ प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. तर, ४ प्रवाशांचा मृ्त्यू झाला असल्याची माहिती आहे.
Mumbai Local mumbra station Accident
Mumbai Local mumbra station Accident Saam TV News
Published On

Mumbai Local mumbra station Accident: मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या घर्षणेमुळे प्रवाशांचा हकनाक बळी गेला आहे. ०९ जून २०२५, सकाळी सुमारे ०९:२० वाजता, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ हा गंभीर अपघात घडला. लोकल ट्रेनमधून अंदाजे १३ प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत.

जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात आणि सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांना काही वेळापूर्वी ज्युपिटर रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, मृत्यू तसेच जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आता समोर आली आहे.

Mumbai Local mumbra station Accident
Local accident: मुंबईच्या रेल्वे रूळावर मृत्यू तांडव, लोकल अन् एक्सप्रेसचा अपघात; ५ जणांचा मृ्त्यू, १२ जखमी

मृत्यू झालेल्यांची माहिती:

१. केतन दिलीप सरोज (पुरुष, वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर)

२. राहुल संतोष गुप्ता

३. विकी बाबासाहेब मुख्यदल (पुरुष, वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी)

४. एक अज्ञात व्यक्ती

त्यापैकी एकाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झाला असून, उर्वरित तिघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जखमी प्रवाशांची माहिती पुढीलप्रमाणे:

१. शिवा गवळी (पुरुष, वय २३) – प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

२. आदेश भोईर (पुरुष, वय २६, रा. आढगाव, कसारा) – प्रकृती स्थिर; शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू.

३. रिहान शेख (पुरुष, वय २६, रा. भिवंडी; प्रवास: कल्याण ते ठाणे) – प्रकृती स्थिर.

४. अनिल मोरे (पुरुष, वय ४०) – प्रकृती चिंताजनक; ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवले.

५. तुषार भगत (पुरुष, वय २२; प्रवास: टिटवाळा ते ठाणे) – प्रकृती स्थिर.

६. मनीष सरोज (पुरुष, वय २६, रा. साबेगाव, दिवा) – प्रकृती स्थिर.

७. मच्छिंद्र गोतारणे (पुरुष, वय ३९, रा. वाशिंद) – प्रकृती स्थिर.

८. स्नेहा धोंडे (स्त्री, वय २१, रा. टिटवाळा; प्रवास: टिटवाळा ते ठाणे) – प्रकृती स्थिर.

९. प्रियंका भाटिया (स्त्री, वय २६, रा. शहाड, कल्याण) – प्रकृती स्थिर.

Mumbai Local mumbra station Accident
Mumbai Local: १,२,३,४,५,६... मुंब्रा स्थानकावर मृतदेहाचा खच, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

सर्व जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com