

मुंबई मेट्रो लाइन 2B चं काम पूर्ण
या दिवशी होणार सुरु
चेंबूर स्थानकाचं काम प्रगतीपथावर
मुंबई मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस पसरत आहे. मुंबईत सर्व ठिकाणी मेट्रो होणार आहे. दरम्यान आता मेट्रोल लाइन 2B लवकरच सुरु होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण लवकरच ही मेट्रो लाइन सुरु करणार आहे. अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील एक टप्पा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.
मेट्रो लाइन 2B मधील पहिला टप्पा म्हणजेच डायमंड गार्डनर ते मंडाले टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठीच एप्रिलपर्यंत चेंबूर मेट्रो स्थानक पूर्ण केले जाणार आहे. हे स्थानक पूर्ण झाल्यानंतर मेट्रो लाइन सुरु होणार आहे. त्यामुळे स्थानकाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
मेट्रो लाइन २ बीचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर चेंबूर स्थानक सेवेत दाखल होणार आहे. यानंतर मंडाले ते चेंबूर अशी मेट्रो धावणार आहे. एप्रिलपासून ही मेट्रोल सुरु केली जाणार आहे.
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A मार्गिकेचा विस्तार हा मेट्रो लाइन 2B द्वारे केला जाणार आहे. ही मेट्रो लाइन २३.६ किलोमीटर लांब आहे. यातील पहिला ५.३९ किमीचा टप्पा म्हणजे डायमंड गार्डनर ते मंडाला हा टप्पा सेवेत दाखल होणार आहे. दुसरा टप्पा डायमंड गार्डनर ते सारस्वत नगर आणि सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असा तिसरा टप्पा असणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यानंतर मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मेट्रोच्या लोकार्पणासाठी वेळ मिळत नसल्याने ही मेट्रो अजूनपर्यंत सेवेत दाखल केलेली नाही. त्यानंतर येत्या काही दिवसात लोकार्पण होईल, अद्याप तारीख समोर आलेली नाही. मात्र, यामधील चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.