

कल्याण शिळफाटा रोडवर मेट्रो धावणार
दहिसरपासून कल्याणपर्यंत मेट्रो जोडली जाणार
८४१४.५३ कोटींचा खर्च
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ला मंजुरी दिली आहे. मेट्रो 12A चा प्रकल्प आता दहिसर मोरी ते तळोजा मार्गे शिळफाटापर्यंत जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदेंनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च ८४१४.५३ कोटी रुपये आहे.
कल्याण डोबिंवली परिसरातील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. यामध्ये मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत रस्ते, रेल्वेचा समावेश आहे. यातील अनेक मार्ग पूर्ण झाले आहेत. काही प्रकल्पांची कामे सुरु आहेत.
तळोजा मेट्रोचा विस्तार
पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, कल्याण रिंग रोडचेही काम सुरु आहे. या कामांसाठी आवश्यक असलेले अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. याचवेळी मेट्रो १२च्या विस्ताराची घोषणा केली आहे. यामुळे कल्याण-शिळफाटा मार्गावर मेट्रो सुरु होणार आहे.
स्थानके कोणती असणार?
पहिल्या मार्गासाठी स्थानके निश्चित झाली आहेत. दुसऱ्या मार्गात डोंबिवली, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरवली गाव, रोहिंजन, खुटारी गाव असणार आहे. भविष्यात मेट्रो लाइन १४शी जोडली जाणार आहे.
काम
सध्या कटाई नाका ते कल्याण फाटा मेट्रो १४ च्या ट्रॅक आणि स्टेशनबाबत प्रस्ताव आहे. ही मेट्रो नीलजे डेपो आणि मेट्रो १४, ठाणे बुलेटस ट्रेनला जोडेल. ही लाइन १८४ किमी लांबीची असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.