Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

Mumbai Mayor Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे चर्चेत आल्या आहेत. रितू तावडे यांनी जैन मुनींच्या आशीर्वादाने घसा ठीक झाल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.
Ritu Tawde:'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?
Ritu TawdeSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईच्या महापौर चर्चेत

  • रितू तावडे यांचा चमत्काराचा दावा चर्चेत

  • अंधश्रद्धा वाढवल्याचा आरोप

  • संजय राऊत यांची रितू तावडेंवर टीका

  • वक्तव्यावरून राजकीय वाद तापला

भरत मोहोळकर, साम टीव्ही

जैन मुनींनी आशीर्वाद दिला आणि चमत्काराने घसा ठीक झाल्याचा दावाच मुंबईच्या महापौरांनी केलाय. तर महापौरांच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांचंही भान सुटलंय. ते नेमकं कसं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

जैन मुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाल्याचा आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या या आहेत रितू तावडे.... मुंबईच्या महापौर... एका बाजूला राज्यात चमत्काराचे दावे करुन महिलांचं शोषण करणाऱ्या खरातचं प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना आता मुंबईच्या महापौरही नम्र मुनींच्या चमत्काराचे दावे करत असल्यांन त्याही अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याची चर्चा रंगलीय. तावडेंच्या या दाव्यानं खळबळ उडालीय. तर रितू तावडेंवर बोलताना ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतंही भान सुटलंय..

आपल्या वक्तव्यानं वाद पेटल्याचं लक्षात येताच महापौर रितू तावडेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय... तर यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही जोरदार समाचार घेतलाय. खरं तर राज्यात मंत्र तंत्र आणि चमत्काराचे दावे करत महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदू खरातचं प्रकरण गाजतय त्याच्या मुसक्याही आवळल्या आहेत... याच दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौरांनीही चमत्कार आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य करणं पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच भुषणावह नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com