ऐन पावसाळ्यात मॅनहोलच्या कामांचा आदेश कुणाचा? मॅनहोलच्या निर्णयावरून अधिकाऱ्यांमध्येच मतभेद

Mumbai Manhole Tragedy: मुंबईतल्या जीवघेण्या मॅनहोलचं काम सुरू करण्याचे आदेश नेमके कुणी दिले यावरून आता वाद सुरू झालाय..आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या विधानांवरून हा सारा गोंधळ समोर आलाय. मुर्दाड बीएमसीच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम झालाय की हात झटकण्याचा नवा डाव आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट........
Confusion within BMC after Mumbai manhole tragedy raises serious concerns over accountability and monsoon safety measures.
Confusion within BMC after Mumbai manhole tragedy raises serious concerns over accountability and monsoon safety measures.saam tv
Published On

मुंबईकरांच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेचा सावळागोंधळ साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणानंतर चव्हाट्यावर आलाय. भर पावसात मॅनहोलची कामं सुरू केल्यामुळेच हा बळी गेल्याचं स्पष्ट झालंय. मात्र या कामांबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणेंनी अशा कुठल्याही कामाचं कंत्राट दिलेलं नसून वर्क ऑर्डरही काढलेली नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र या दुर्घटनेनंतर लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही काम सुरू असल्याचं खुद्द पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीच सांगितलं होतं. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये यावरून मतभेद असल्याचं समोर आलंय. एवढी काम सुरू असून त्याबाबत संभ्रम कसा असू शकतो असा प्रश्न निर्माण झालाय.

दरम्यान जून महिना संपून जुलै महिना सुरु झाला.. तरी मॅनहोलवरील जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण झालं नसल्याचं खुद्द आयुक्त अश्विनी भिडेंनीच कबुल केलयं...आयुक्त अश्विनी भिडेंनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई

एकूण 1 लाख 3 हजार 26 मॅनहोल आहेत. त्यातील 96 हजार 383 मॅनहोलवर जाळ्या बसवल्याची माहिती पालिकेनं दिली... तर रस्तेरुंदीकरणात 1800 मॅनहोल बुजले गेले असून 4 हजार 446 मॅनहोल्सवर अजूनही संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत.

या सुरू असलेल्या कामांवर महापौर आणि उपमहापौरांनीही दुर्घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला होता. उपमहापौरांनी तर अश्विनी भिडेंनाच यासाठी जबाबदार धरत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. पावसाळ्याआधी रस्त्यांची आणि मॅनहोलची काम पूर्ण करून घेणं ही लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचीही जबाबदारी असते...केवळ पत्र दिलं..पाठपुरावा केला अशी कारणं महापौर आणि उपमहापौरांना शोभत नाहीत. सत्ताधारी आहेत तर अधिकाऱ्यांकडून कामं करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरू शकणारी अशी कामं पावसाळ्यापूर्वीच आयुक्त आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी का केली नाहीत? असा गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. मात्र यांच्या निष्काळजीपणाचे बळी ठरले ते निष्पाप अस्लम शेख...त्यामुळे बीएमसीची ही मुर्दाड व्यवस्था अजून किती बळी घेणार ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com