Harbour Line : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; हार्बर ट्रेन बोरिवलीपर्यंत धावणार, कधीपासून सुरु होणार?

Harbour Line Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर लोकल ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेचा मार्ग ८ किलोमीटरने वाढणार आहे.
Mumbai Local Mega Block harbour line
Mumbai Local Mega Block harbour line Saam tv

Harbour Line Mumbai:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर लोकल ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेचा मार्ग ८ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचं काम २०२७-२८ या वर्षात पूर्ण होणार आहे.

हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण केल्याने पश्चिम मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यानची लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा मे महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर या प्रकल्पाचं काम १५ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचं काम दोन टप्प्यात होणार आहे. या प्रकल्पासाठी ८२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Local Mega Block harbour line
Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत स्टेशनचा विस्तार होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या टप्यात ५ किलोमीटरचं काम पूर्ण होईल. त्या टप्प्यात मालाड ते बोरीवली या स्टेशनपर्यंत काम पूर्ण होईल,अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.

Mumbai Local Mega Block harbour line
Dhule Crime : जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूची तस्करी; पोलिसांकडून पर्दाफाश, लाखोंचा साठा जप्त

सध्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेन या सीएसएमटी ते गोरेगाव स्टेशनपर्यंत रेल्वेसेवा सुरु आहे. मागच्या वेळी हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव हा टप्पा वाढविण्यात आला होता. या टप्प्याचं काम २०१८ पर्यंत पूर्ण झालं होतं.

Mumbai Local Mega Block harbour line
Mumbai Water Stock : मुंबईकरांची जलचिंता वाढली; धरणातील पाणीसाठा २७ टक्क्यांवर

दरम्यान, बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरण करण्यासाठीचं प्राथमिक काम पूर्ण झालं आहे. या कामासाठी भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, झाडांचे ड्रोन सर्वेक्षण आदी कामांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com