local train
local trainSaam Tv

Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत

Woman Physically Abused In Local: मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News

मुंबईत (Mumbai) धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी श्रावणकुमार विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली (Mumbai Crime) आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली आहे. जनरल डब्यात आरोपीने पीडित महिलेची छेड काढली होती. (Latest Marathi News)

धावत्या लोकल ट्रेनच्या खचाखच भरलेल्या जनरल डब्यात सोमवारी रात्री एका २८ वर्षीय पुरुषाने एका महिला प्रवाशाची छे़ड काढल्याप्रकरणी अटक करण्यात (Crime News) आली. २५ वर्षीय पीडित महिला ऑफिसमधून तिच्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत प्रवास करत होती. रात्री आठच्या सुमारास वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी सांगितलं (Woman Physically Abused In Local) की, आरोपी श्रावणकुमार विश्वकर्मा हा गोरेगावकडे जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेनमध्ये वांद्रे येथे चढला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तो पीडित महिलेच्या जवळच्या पॅसेजमध्ये उभा राहिला. तिला अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या तिच्या सहकाऱ्याने सहप्रवाशांसह त्याला (Physically Abused) पकडले. त्याला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी मूळचा जोगेश्वरीचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे ट्रेनमधील (local) प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. लैंगिक छळाच्या आरोपाखाली आरोपीवर आयपीसी कलम 354 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.

local train
Vasai Crime News : तीन वर्षांपासून फरार खुनातील आरोपी अखेर ताब्यात; प्रेयसीच्या पतीची केली होती हत्या

आणखी एका प्रकरणात, मालवणी पोलिसांनी तीस वर्षांच्या एका व्यक्तीला चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक (Mumbai Crime News) केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने ४ वर्षांच्या मुलीला त्याच्या राहत्या घरी चॉकलेटचं आमिष दाखवून तिचा विनयभंग केला होता. पीडित अल्पवयीन मुलीने पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. याप्रकरणात देखील पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

local train
Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com