Mumbai Water Stock : मुंबईकरांची जलचिंता वाढली; धरणातील पाणीसाठा २७ टक्क्यांवर

Mumbai Lakes Water Storage : सध्या यांमध्ये सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साल २०२२ मध्ये ३६.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
Mumbai Lakes Water Storage
Mumbai Water StockSaam TV

Mumbai Water Stock:

मुंबईकरांसाठी काहीशी चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना जून अखेरपर्यंत पुरू शकतो. मात्र पावसाने उशिर केल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Mumbai Lakes Water Storage
Mumbai Indians: हार्दिक- रोहितमधला दुरावा संपला! आता मुंबई इंडियन्स धुरळा उडवणार

उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा या सात धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांतून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

सर्व धरणांमधील शिल्लक पाणीसाठा

रविवारी उर्ध्व वैतरणा धरणात ३६.६० टक्के

तुळशीमध्ये ४४.२० टक्के

मध्य वैतरणामध्ये १२.१३ टक्के

मोडकसागरमध्ये २४.९७ टक्के

भातसामध्ये २६.३४ टक्के

तानसामध्ये ४१.८६ टक्के

विहारमध्ये ३९.६१ साठयाची नोंद झाली.

सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या यांमध्ये सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साल २०२२ मध्ये ३६.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

राज्यात आणि देशातील पाणीसाठा किती?

राज्यात आणि देशातील विविध धरणांमधील पाणीपातळी देखील कमी होत चालली आहे. अशात सध्या राज्यात आणि देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

राज्यात सर्वात कमी पाणीसाठा औरंगाबादमध्ये

जलसंपदा विभागाने पाणीसाठ्याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी म्हणजे १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Mumbai Lakes Water Storage
Fridge Cold Water : फ्रिजमधील थंड पाणी पिल्याने तुम्हाला जडतील 'हे' आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com