Mumbai Local : मोठी बातमी! मिरारोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली, मजुरांच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरुप

mira road railway station News update : मिरारोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे. मिरारोड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरून हलत असल्याचे दिसून आले. यावेळी काही मोठा अपघात होण्याआधी मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Mumbai Local
Mumbai Local Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा रोड

Mira Road Railway Station News :

मुंबईत रविवारी मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेनमध्ये आज गर्दी पाहायला मिळत होती. याचदरम्यान लोकल संदर्भात एक मोठं वृत्त हाती आलं आहे. मिरारोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे. मिरारोड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरून हलत असल्याचे दिसून आले. यावेळी काही मोठा अपघात होण्याआधी मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे प्रशासनाकडून या मजुरांचं कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोड रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना टळली आहे. मिरारोड स्थानकावरून चारच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एक एक्स्प्रेस गेली, त्यावेळी रेल्वे मजुरांना गाडीचे डब्बे हालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे रेल्वे कामगार थोडे जवळ गेले. त्यावेळी कामगारांना रेल्वे रुळ वाकडं झाल्याचं दिसून आलं.

Mumbai Local
BJP-Shivsena Mira Road Rada | भाजपचे नगरसेवक सरनाईकांना भिडले, मीरा-रोडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

रेल्वे ट्रॅकमधील दगड कमी झाल्याने रेल्वे ट्रॅक वाकडं झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे कामगारांनी पोलिसांनी आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर प्लॅटफॉर्मव क्रमांक ४ वरून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन थांबविण्यात आली. त्यानंतर लोकल ट्रेनमधील प्रवाशांना उतरण्यास सांगितलं.

Mumbai Local
Ajit Pawar Latest Speech : कोयता गँगचा सुपडा साफ करणार; अजित पवार स्पष्टच बोलले

लोकलमधील सर्व प्रवासी उतरल्यानंतर हळूहळू लोक ट्रेन ट्रॅकवरून पास करण्यात आली. बाजूच्या पटरीवर काम करणाऱ्या मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com