Mumbai Local Train: लोकल खोळंबली! अंबरनाथजवळ मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड

Mumbai Local Train: अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथजवळ मध्य रेल्वेच्या डाऊन लाईनवर तांत्रिक बिघाड झाला आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local Trainsaam tv
Published On: 

Mumbai Local Train: अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथजवळ मध्य रेल्वेच्या डाऊन लाईनवर तांत्रिक बिघाड झाला आहे. मालगाडी बंद पडल्याने अंबरनाथवरून पुढे जाणारी वाहतूक अक्षरश: ठप्प झाली आहे. अचानक वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Latest Marathi News)

Mumbai Local Train
Monsoon Weather: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत आली मोठी अपडेट

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे मध्य रेल्वेच्या डाऊन लाईवर एका मालगाडीत तांत्रिक बिघाड झाला. मालगाडी अचानक बंद पडल्याने कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जवळपास १५ ते २० मिनिटापासून अंबरनाथ स्थानकावरच आहेत.

Mumbai Local Train
Virat Kohli-Gautam Gambhir : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर १.०७ कोटींचा दंड विराट कोहली भरणार नाही, कारण...

अचानक मालगाडीत बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच लोकलची वाहतूक सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.