.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai local delay update Central line : ऐन गर्दीच्या वेळी एकाच ट्रॅकवर २ लोकल आल्याने मध्य रेल्वेवर एकच खळबळ उडाली. मस्जिद बंदर स्थानकाजवळ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूरहून सीएसएमटीकडे येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर घेण्यात आली, त्यामुळे एकाच वेळी दोन लोकल एकाच ट्रॅकवर आल्या. मोटरमनने वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मुंबईत मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. सकाळीही लोकल सेवा विस्कळीत झाली होती; आज दिवसभरात दुसऱ्यांदा लोकल सेवेचा खोळंबा झाला.
नेमकं काय घडलं? वाचा
बदलापूरहून येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणार होती. पण ती ऐनवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर घेण्यात आली. कारण प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आधीच एक लोकल उभी होती. यामुळे ट्रॅकवर लोकल थांबून राहिल्या. मस्जिद बंदरावर लोकल एकापाठोपाठ एक रांगेत उभ्या होत्या. मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात घटला. दुपारी सव्वा ३ नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ हे काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर लोकल गाड्या मागे घेण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
स्टेशन मास्तरवर कारवाई -
दुपारी ३ वाजताच्या सुमारास एकाच प्लेटफॉर्मवर २ लोकल समोरासमोर आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची मध्य रेल्वेकडून गांभार्याने दखल घेत स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई केली. " ही घटना फार गंभीर असून, त्यामुळे मोठा अनर्थ झाला असता" हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्टेशनवरील मास्तरवर निलंबनाची कारवाई केली.
मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला आज जणू ग्रहणच लागले होते. सकाळपासूनच लोकल उशिराने धावत होतीच. त्यातच सकाळी तांत्रिक बिघाडामुळे कल्याणहून सीएसटीएमटीकडे जाणारी लोकल ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. कामाच्या वेळी लोकल खोळंबल्यामुळे मुंबईकरांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. त्यातच संध्याकाळी पुन्हा मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा झाला. कामावरून घरी परत जात असताना लोकल उशिरा धावत होत्या. इतकेच नाही तर सोमवारीही मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.