

Mumbai Local Train Harbor Line News: मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. अचानक लोकल खोळंबल्याने भल्यापहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यानच्या रुळावर हा शॉर्ट सर्किट सारखा प्रकार घडला. त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. गेल्या २० मिनिटापासून सर्व गाड्या नेरूळ ते जुईनगर दरम्यान, थांबल्या आहेत. (Mumbai Local Train News)
दरम्यान, ओव्हरहेड वायर सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या लेनची तुटली, की खारकोपर लेनची याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जर सीएसएमटी लेनची वायर तुटली असेल, तर काही तास गाड्या फक्त सीएसटी वाशी याच दरम्यान धावतील आणि खारकोपरची वायर तुटली असेल तर ती लाईन बंद राहणार असल्याची शक्यता आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.