'तो तरूण तुम्हाला बघून हस्तमैथुन..' लोकलमध्ये तरूणीच्या बाजूला बसून घाणेरडं कृत्य, नंतर जे घडलं ते भयंकर

Mumbai Local Train: ठाणे-वाशी लोकलमध्ये तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले. महिलेने संतापून तरुणाला कानाखाली लगावली आणि मारहाण केली. इतर प्रवासीही संतप्त झाले आणि जमावाने तरुणाला चोप दिला.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam
Published On
Summary
  • ठाणे-वाशी लोकलमध्ये तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले.

  • महिलेने संतापून तरुणाला कानाखाली लगावली आणि मारहाण केली.

  • इतर प्रवासीही संतप्त झाले आणि जमावाने तरुणाला चोप दिला.

  • जमावापासून वाचण्यासाठी त्या तरुणाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली.

राज्यात महिला अत्याचारांवरील घटना समोर येत असताना आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ठाणेहून वाशीला जाणाऱ्या हार्बर लाईन ट्रेनमध्ये एक तरूण महिलेकडे बघून हस्तमैथून करत होता. यावेळी या तरूणाला घाणेरडे कृत्य करताना पकडण्यात आले. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलेच्यासमोर बसलेल्या एका प्रवाशानं तिला जागा बदलण्यास सांगितले. महिलेनं तेव्हा कारण विचारले. तेव्हा त्या व्यक्तीने, शेजारी बसलेला तरूण अश्लील कृत्य करत असल्याचं सांगितलं.

Mumbai Local Train
Kalyan: इमारतीची लिफ्ट ६व्या मजल्यावरून खाली कोसळली, ८ जणांपैकी चौघे जखमी, दोघांचा पाय फ्रॅक्चर

यावेळी त्या व्यक्तीने तरूणाचा व्हिडिओ शूट केला. तरूणाचा कारनामा पाहताच महिला संतापली. तिने लोकलमध्येच तरूणाच्या कानाखाली लगावली. तसेच लाथा मारण्यास सुरूवात केली. या दरम्यान, ट्रेनमधील प्रवासी पाहत राहिले. इतर प्रवासीही यावेळी संतापले. त्यांनी तरूणाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

महिलेच्या मारहाणीपासून आणि संतप्त जमावापासून वाचण्यासाठी त्या तरूणाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. या घटनेचा व्हिडिओ अबरार शेख या इन्स्टाग्रामवर युजरनं शेअर केला आहे. पोस्टमध्ये अबरारने लिहिले की, सार्वजनिक ठिकाणी असे घाणेरडे कृत्य करणे हा केवळ गुन्हाच नाही तर, समाजासाठी लज्जास्पद देखील आहे. जर अशा नराधमांना वेळीच शिक्षा झाली नाही तर, महिलांची सुरक्षितता नेहमीच धोक्यात राहील, असं ते म्हणाले.

Mumbai Local Train
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com