Mumbai Local Train Viral Video: क्षुल्लक कारणावरुन प्रवाशांमध्ये वाद; दिवा स्टेशनवर दोघांना प्लटफॉर्मवर लोळवून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

मुंबईची लोकल ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात.
Mumbai Local Train Viral Video
Mumbai Local Train Viral VideoSaam tv

Mumbai Train Viral Video : मुंबईची लोकल ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. सांयकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, लोकल ट्रेनमधून उतरलेले प्रवासी काही प्रवाशांना मारताना दिसत आहे. एकापेक्षा जास्त प्रवासी हे दोन प्रवाशांना मारताना दिसत आहे. ४५ सेकंदच्या या संपूर्ण व्हिडिओ (Viral Video) प्रवासी फारच आक्रमक झालेले दिसत आहेत.

फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर काही जण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Mumbai Local Train Viral Video
Viral Video: 'उड जायेगा एक दिन पंछी...'; प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमध्ये काकांनी गायली जबरदस्त कव्वाली

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-कर्जत ट्रेन (Train) दिवा स्टेशनवर सांयकाळी ७:१० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. लोकल ट्रेनमधून उतरताना क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

कर्जत कसारा, खोपोली ट्रेनला दिवा रेल्वे स्टेशनला थांबा असल्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यामुळे ठाणे स्टेशनवरून अनेक प्रवाशांना चढायला मिळत नसल्याची काही प्रवाशांची तक्रार आहे. या गर्दीमुळे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपींवर कारवाई करा; प्रवाशांची मागणी

दिवा स्टेशनवरील प्रवाशांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वाढती गर्दी आणि प्रवाशांची दादागिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे, असंही अनेक प्रवाशांचं म्हणणं आहे.

याचबरोबर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असेही प्रवाशांचं म्हणणं आहे. दिवा स्टेशनवरील फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलतील, हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com