Mumbai Local train latest Viral Video: मुंबईच्या लोकल ट्रेनची जगभरात चर्चा होते. मुंबईतील लोकलच्या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. चाकरमानी खचाखच भरलेल्या गर्दीतून कामानिमित्त प्रवास करत असतो. या गर्दीतून प्रवास व्यवस्थित आसनव्यवस्थेवर बसून प्रवास करणे अनेकांच्या नशिबी नसतेच. याच लोकल ट्रेनमध्ये एका काकांनी गायलेली एक कव्वाली प्रचंड व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)
गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये रोजचे प्रवासी त्यांना जागा करतातच. रोजच्या प्रवासामुळे लोकलमध्ये प्रवाशांनी मैत्री करून अनेक ग्रुप तयार केले आहेत. त्यामुळे गप्पा-गाणी करत या प्रवाशांचा प्रवास सुखाचा होतो.
त्यामुळे रोज भेटणारे प्रवासी एकमेकांचे जिगरी दोस्त झाले आहेत. अनेक प्रवासी रोजची न्याहारी आणून एकमेकांमध्ये वाटत खात-खात प्रवास करत असतात. यात काही भजनी मंडळीचा देखील ग्रुप आहे. हा ग्रुप भक्ती गीते गात प्रवास करत असतो.
अशाच एका ग्रुपमधील एका काकांनी खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'उड़ जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, या आशयाची कव्वाली गायली आहे. ही कव्वाली सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
लोकल ट्रेनमध्ये गाणाऱ्या काकांबद्दल माहिती मिळाली नाही. मात्र, कव्वालीचा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर एका सचिन नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक युजर म्हटला की, 'हाडाचा कलाकार यांना म्हणतात'.
दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'खूप छान भाऊ, हीच खरी परंपरा आहे'.या व्हिडिओवर दोन हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर १५ हजार जणांनी लाईक केला आहे.
दरम्यान, 'उड जायेगा एक दिन पंछी...' ही मूळ कव्वाली प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायली आहे. त्यांच्या पहाडी आवाजात गायललेल्या कव्वाली आणि गाणे आजही चाहत्यांना फार आवडतात. प्रल्हाद शिंदे यांनी कव्वाली गाण्यासहित लोकगीते, कोळीगीते आणि भीमगीते देखील गायली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.