Mumbai Local : गर्दीच्या रेट्यामुळे दुर्देवी घटना, अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

Mumbai Local Train Accident : अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली.
Mumbai Local
Mumbai Local
Published On

Mumbai Local Accident : अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्ये गर्दी होती. पाय ठेवायालाही जागा नव्हती. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात खाली उतरली, पुन्हा लोकलमध्ये चढली खरी पण आतमध्ये जाता आलेच नाही. लोकलच्या दारात उभी असताना हात सुटला अन् खाली पडली. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. ऋतुजा गणेश जंगम असं या महिलेचे नाव असून ती कर्जतला राहणारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ऋतुजा ही ठाण्याला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ठाण्याहून कर्जत ट्रेनने परतताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे ती खाली उतरून पुन्हा ट्रेनमध्ये चढली, पण यावेळी तिला गर्दीमुळे आत जाताच आलं नाही आणि ती दारात उभी राहिली.

Mumbai Local
Mumbai Local: मोठा दिलासा! मुंब्रा आणि कळवा स्थानकावर जलद लोकल थांबणार, पाहा नवं वेळापत्रक

अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सुटून ती खाली पडली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. गर्दी असताना लोकलमधून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून कऱण्यात आलेय.

Mumbai Local
Viral Video : लोकल प्रवासात डुलकी घेणे पडले भारी, घडलेल्या प्रकारामुळे लोकं हैराण! हा व्हिडीओ एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com