Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Central And Harbour Railway: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Mumbai Local Mega BlockSaam TV
Published On

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी म्हणजेच २१ जुलै २०२४ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Mumbai Local News: मुंबईत पावसाचा हाहाकार; मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरा..

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ .०५ वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या पुढे त्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या लोकलसेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Microsoft Outage At Mumbai Airports : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसचा सेलिब्रिटींना फटका, अर्जन रामपालही मुंबई विमानतळावर तासभर अडकला

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११. १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. सीएसएमटी येथून वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा २० मिनिटांनी चालवण्यात येतील.

Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Mumbai Local Train : मुंबईत पहाटेपासूनच तुफान पाऊस, तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवाशांचे प्रचंड हाल

पश्चिम रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ ते माहीम अप - डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धिम्या मार्गावरील लोकलसेवा मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर लोकल गाड्यांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या अपुऱ्या लांबीमुळे आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड रेल्वेस्थानकावरही थांबणार नाही.

Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Mumbai Building Collapse: मोठी दुर्घटना! ग्रँट रोडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com