Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक

Central Railway Run 12 Special Local Train: मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Central Railway Run 12 Special Local TrainSaam Tv
Published On

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबतल्या दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठ्यासंख्येने येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहेत.

मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवणार आहेत. या उपनगरीये विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. तसंच प्रवास करताना प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Mumbai Local : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल खोळंबा, वेग मंदावला, प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वे मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल -

- कुर्ला-परळ विशेष लोकल कुर्ला येथून रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे १.०५ वाजता पोहोचेल.

- कल्याण-परळ विशेष लोकल कल्याण येथून मध्यरात्री १.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.

- ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून मध्यरात्री २.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या वर्षी केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट आणि बरंच काही...

- परळ-ठाणे विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री १.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.

- परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री २.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.

- परळ-कुर्ला विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री ३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वेवर आजपासून धावणार 13 एसी लोकल, वेळापत्रक जाणून घ्या

हार्बर मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल -

- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.१० वाजता पोहोचेल.

- पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून मध्यरात्री १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.४५ वाजता पोहोचेल.

- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.४० वाजता पोहोचेल.

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Railway Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप सी आणि डी पदांसाठी भरती, पगार किती? जाणून घ्या

- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ३.०० वाजता पोहोचेल.

- कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री ३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०० वाजता पोहोचेल.

- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री ४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ४.३५ वाजता पोहोचेल.

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल धावणार, वाचा वेळापत्रक
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com