Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला होता. पण दुरूस्तीनंतर ही लोकल बदलापूरच्या दिशेने रवाना झाली.
Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
AC LocalSaam TV
Published On

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान दादर-बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर- बदलापूर एसी लोकलमध्ये १२ वाजून १० मिनिटानी बिघाड झाला. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान एसी लोकल बंद पडली. एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही लोकल एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्यामागे दोन लोकल देखील थांबून आहेत.

Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Crime News : मुंबई हादरली! गोरेगावमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; २९ वर्षीय तरुणाला अटक

दरम्यान, मध्य रेल्वेकडून तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. पेंटाग्राफमधील बिघाडामुळे काही काळ डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तातडीने केलेल्या दुरुस्तीमुळे लोकल सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दादरहून बदलापूरकडे जाणारी एसी लोकल अखेर बदलापूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com