Mumbai mega block : मुंबईत 'या' दोन दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने येत्या शनिवारी आणि रविवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे.
mega block news
mega block news saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : मुंबईतील चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने येत्या शनिवारी आणि रविवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक हा मध्य रेल्वेसहित हार्बर मार्गावर देखील असणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेन या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे. ( Mumbai MegaBlock News In Marathi)

mega block news
CBSE 10th Result 2022 : सीबीएसईनं दहावीचा निकाल केला जाहीर; असा पाहा निकाल

येत्या शनिवारी आणि रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. भायखळा - माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) अप जलद मार्गावर येत्या शनिवारी रात्री ११.३० पासून रविवारच्या पहाटे ४.०५ पर्यंत असणार आहे. तर रविवारी मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० पर्यंत डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी सकाळी ५.२० वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचणार आहे. तसेच ठाणे येथून शनिवारी रात्री १०.५८ आणि रात्री ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे सदर लोकल ट्रे (Local Train )न या त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायवर्शन

मेगाब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे दुहेरी थांबा देण्यात येईल आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पाठविण्यात येईल.

गाडी क्रमांक 11058 अमृतसर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या गाडीला दादर, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

mega block news
२६ किंवा २७ जुलैला होऊ शकतो मंत्रिमंडळाचा विस्तार; २५ ते ३० आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

हार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉक

येत्या रविवारी पनवेल -वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. बेलापूर - खारकोपर BSU मार्गाव्यतिरिक्त हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ पासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com