Mumbai Local Derail : मुंबई सेंट्रलजवळ लोकल घसरली, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Local Accident : पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
Mumbai Local Derail
Mumbai Local DerailSaam TV
Published On: 

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल रुळावरुन घसरल्याची घटना समोर आली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ ही लोकल रुळावरून घसरली आहे. यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

प्रवाशांच्या गर्दीच्या वेळेत लोकल रुळावरुन घसरल्याने मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ कारशेडकडे जाणारी रिकामी लोकल रेल्वे रुळावरून घसरली आहे. (Latest News Update)

Mumbai Local Derail
Uttar Pradesh Accident News : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

अपघातानंतर पश्चिम रेल्वेवरील डाऊन मार्गावरील वाहतूक यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com