Uttar Pradesh Accident News : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

Varanasi Accident : अपघातात फक्त ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. लहानग्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 Maval Accident News
Maval Accident NewsSaam tv
Published On: 

Uttar Pradesh Accident News :

उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. वाराणसीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात फक्त ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. लहानग्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारखियांव येथे कार आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सकाळी ७ वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. (Latest News Update)

अपघातातील मृत नागरिक पिलीभीत येथील रहिवासी आहेत. सर्वजण वाराणसीतून देवदर्शन करून परतत असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Accident News)

 Maval Accident News
Swades Actress Gayatri Joshi Accident: ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कारला अपघात, दोघांचा मृत्यू; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

वाराणसी जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com