
Mumbai Local Train News : मुंबईमध्ये लोकलमध्ये गर्दी होण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. नोकरीधंद्यासाठी दररोज देशातील विविध ठिकाणांहून लोक मुंबईला येत असतात. लोकसंख्या वाढल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे उपाय सुचवण्यात आले आहेत.
लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि रेल्वे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने ८०० हून अधिक संघटनांना पत्र लिहून त्यांच्या कार्यालयीन वेळांचे वेळापत्रक बदलण्याचे आवाहन केले आहे. सध्या मध्यरेल्वे प्रशासनाद्वारे दररोज १,८१० लोकल ट्रेन चालवल्या जातात. यातून प्रतिदिनी ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे दरम्यान असलेल्या सरकारी तसेच खाजगी कार्यालयांच्या वेळांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे गर्दीच्या काळात उपनगरीय गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या वाढते आणि प्रचंड गर्दी होते.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीदरम्यान मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ९२२ जणांचा अनावधानाने मृत्य झाला. यापैकी २१० जण हे चालत्या ट्रेनमधून पडून झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित ७१२ जण ट्रॅक क्रॉसिंग किंवा अन्य कारणांमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. कल्याण स्थानकात सर्वाधिक ५० जणांचा मृत्यू झाले आहेत. ठाण्यामध्ये २२, तर कुर्ला स्थानकात १९ जणांचा जीव गेला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने सुचवलेल्या उपायामुळे गर्दीच्या वेळेत शहरातील लोकल ट्रेन सेवांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाही. ऑफिस, कार्यालयीन संघटना यांनी त्यांच्या कार्यालयीन वेळापत्रकांमध्ये बदल केल्याने गर्दी होणार नाही. गर्दी न झाल्याने गर्दीमुळे होणारे अपघात देखील होणार नाहीत, अशी विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.