Shocking
Shockingx

Shocking : आईला भूतबाधा झाली म्हणून मांत्रिकाला घरी बोलावले, तरुणाने मांत्रिकासह जन्मदात्या आईला केली मारहाण; महिलेचा मृत्यू

Crime News : भूतबाधेच्या संशयावरुन एका तरुणाने जन्मदात्या आईला मारहाण केली. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलाला अटक केली आहे.
Published on

भुताटकीच्या संशयावरुन एका मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करुन ठार मारले. ही घटना सोमवारी (७ जुलै) रात्री कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेचा मुलगा संजय आणि भूत झटकण्याचा दावा करणारी महिला आणि तिच्या पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गीताम्मा असे आहे. गीताम्माच्या वागण्यात बदल जाणवल्याने आपल्या आईवर भुताटकी असल्याचे गीताम्माच्या मुलाला, संजयला वाटले. तो गीताम्माला आशा नावाच्या एका महिलेकडे घेऊन गेला. आशा भुताटकी पळवून लावण्यात पटाईत असल्याचे संजयला कुणीतरी सांगितले होते.

Shocking
Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! कॉम्प्युटर क्लास मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

विधी करुन तुझ्या आईवरील भूत पळवून लावण्याचा दावा आशाने केले. त्यानंतर आशा आणि तिचा पती संतोष हे दोघे संजयच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी गीताम्मासमोर अघोरी विधी केल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गीताम्मा अर्धबेशुद्ध अवस्थेत जमिनीवर बसलेली दिसते. तिचे केस विस्कटलेले असून, आशा तिच्या डोक्यावर लिंबू फिरवताना दिसते. आशा लिंबू दोन भागात कापते, गीताम्माच्या डोक्यावर चोळते आणि मारायला सुरुवात करते.

Shocking
Shocking News : महिला चेटकीण असल्याचा संशय; अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

आशा भूत काढण्यासाठी गीताम्माचे केस ओढते, तिला चापट मारते. शेवटी लाकडाच्या काठीने गीताम्माला अमानुषपणे मारहाण करते. वृद्ध गीताम्मा मारहाणीपासून वाचण्याचा प्रयत्न करते. पण मारहाण थांबत नाही, असे व्हिडीओत दिसते. हा अघोरी प्रकार रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास सुरु होऊन मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरु राहतो.

Shocking
Mira Bhayander Marathi Morcha : मीरारोड स्टेशनबाहेर मोर्चा, आंदोलनस्थळी चिमुकल्याची शिवगर्जना; पाहा Video

अमानुष मारहाणीमुळे गीताम्मा गंभीररित्या जखमी झाली होती. शारीरिक जखमा झाल्या असताना उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संजय, आशा आणि संतोष या तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

Shocking
भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com